24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडापी. व्ही. सिंधू सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये

पी. व्ही. सिंधू सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये

एकमत ऑनलाईन

सिंगापूर : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या फायनलपर्यंत धडक मारली आहे. तिने सेमी फायनलमध्ये जपानच्या साईना कावाकामीचा पराभव केला. सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ गेममध्ये जिंकला. या हंगामात सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० टायटल जिंकली आहेत. कावाकामी विरूद्धच्या हेड टू हेड सामन्यात सिंधू २-० ने आघाडीवर होती.

कावाकामी सोबत ती २०१८ मध्ये चायना ओपनमध्ये खेळली होती. कावाकामीने २०१९ मध्ये ऑरलान्स मास्टर जिंकली होती. तर स्विस ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. हैदराबादच्या या २७ वर्षाच्या स्टार बॅडंिमटनपटूने या वर्षीच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची देखील कमाई केली होती. आता ती २०२२ मध्ये आपल्या पहिल्या वहिल्या सुपर ५०० टायटलच्या अगदी जवळ पोहचली आहे. जपानच्या एया ओहोरी आणि चीनच्या वांग झी यी यांच्यातील सेमी फायनलमध्ये जो जिंकेल तिच्यासोबत सिंधू फायनलमध्ये भिडणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या