23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकच्या हिंदू डॉक्टरांना भारतात पॅ्रक्टिस करता येणार

पाकच्या हिंदू डॉक्टरांना भारतात पॅ्रक्टिस करता येणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत सरकारने पाकिस्तानातील हिंदूंसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे भारताने पाकिस्तानी हिंदू डॉक्टरांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. पाकिस्तानमध्ये छळ करण्यात आलेल्या हिंदू आणि शिखांसह इतर अल्पसंख्याक डॉक्टरांना भारतात प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

नॅशनल मेडिकल कमिशनने त्यांना भारतात डॉक्टर म्हणून काम करण्याची दारे खुली केली आहेत. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान सोडून ंिहदुस्थानात आलेल्या पाकिस्तानी अल्पसंख्याकांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी आता नॅशनल मेडिकल कमिशनने आधुनिक वैद्यकशास्त्र किंवा अ‍ॅलोपॅथीचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी भारतीय नागरिकत्व घेतलेल्या लोकांकडून अर्ज मागवले आहेत.

वैद्यकीय पदवीधरांना सक्षम करण्यासाठी पुढाकार
एनएमसीच्या अंडरग्रॅजुएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने शुक्रवारी जारी केलेल्या सूचनेनुसार, निवडलेल्या अर्जदारांना आयोग किंवा त्याद्वारे अधिकृत एजन्सीद्वारे घेण्यात येणा-या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल. प्रस्तावित चाचणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी जूनमध्ये तज्ज्ञांचा एक गट स्थापन केला होता. पाकिस्तानमधील छळ झालेल्या अल्पसंख्याकांमध्ये वैद्यकीय पदवीधरांना सक्षम करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना भारतात सराव करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी करता येणार आहे.

सूचनांचे काटेकोरपणे पालन आवश्यक
यूएमईबीच्या नियमांनुसार, अर्जदाराची वैध वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे. भारतात स्थलांतरित होण्यापूर्वी त्याने पाकिस्तानमध्ये सराव केलेला असावा. ५ सप्टेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. अर्जदारांनी एनएमसी वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या