18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयदिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एके ४७ रायफलसह काही ग्रेनेड्स जप्त करण्यात आले आहेत. मोहम्मद अश्रफ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहे.

लक्ष्मीनगरच्या रमेश पार्क परिसरात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे. संबंधित दहशतवाद्याकडे बनावट भारतीय ओळखपत्र होते. मोहम्मदकडून एक एके ४७ रायफल, एक मॅगझिन, एक हँडग्रेनेड, आणि ६० काडतुसांसह २ पिस्तुले जप्त करण्यात आली. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. सध्या लक्ष्मीनगर भागात शोधमोहीम सुरू आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या