26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home आंतरराष्ट्रीय पाकव्याप्त काश्मीरात रेल्वेमार्ग बांधण्याचा पाकचा डाव

पाकव्याप्त काश्मीरात रेल्वेमार्ग बांधण्याचा पाकचा डाव

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद: चीनशी हातमिळवणी करून भारताला घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानने आता नवी चाल खेळली आहे़ कंगाल झालेल्या पंतप्रधान इम्रान खान सरकारने वादग्रस्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये रेल्वे रेल्वेमार्ग बांधण्यासाठी ६.८ कोटी अब्ज डॉलरचा म्हणजे सुमारे २१ हजार कोटी रुपये बजेट मंजूर केला आहे. हा रेल्वे मार्ग चीनच्या महत्वाकांक्षी चीन-पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडॉरचा भाग असल्याचे म्हटले जात आहे़ रेल्वे रेल्वेमार्ग पीओकेमध्ये कुठून कुठपर्यंत बांधली जाईल हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

काही दिवसांपूर्वी चीनने पाकिस्तानच्या इस्लामाबाद ते शिनजियांग प्रांतातील काश्गर पर्यंतच्या रस्त्याचा काही भाग सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे, असे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे. पाकिस्तानमध्ये ११८ किमी लांबीच्या या रस्त्याच्या एका टोकाला थाकोट आहे. तर दुर्स­या टोकाला हवेलियन आहे. चीन आणि पाकिस्तान भारतावर दबाव आणण्याच्या उद्देशाने काम करत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी वादग्रस्त नकाशा जाहीर केला होता. कश्मीरमधून कलम ३७० हटवल्याविरोधात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा नवीन नकाशा जारी केला होता. या नकाशामध्ये पाकिस्तानने लडाख, जम्मू-काश्मीरमधील सियाचीन, गुजरातमधील जुनागड आणि सर क्रीकवर दावा केला आहे. पाकचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानमधील सीपीईसी प्रोजेक्ट धोक्यात पाकिस्तानमधील सीपीईसी प्रकल्पात चीनने कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पण याची सुरक्षा धोक्यात आली असूनकिंमत वाढल्याने चीनचिंतेत आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये अतिरेक्यांचे हल्लेही तीव्र झाले आहेत.

स्पेशल फोर्स बनवूनही हल्ले सुरूच
सीपीईसी प्रोजेक्ट ६० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या खर्चाचा आहे. या प्रकल्पाच्या संरक्षणासाठी पाकिस्तानने १३७०० विशेष कमांडो असलेले एक विशेष दल स्थापन केले आहे. तरीही या प्रकल्पात काम करणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले सातत्याने वाढत आहेत. कराची स्टॉक एक्सचेंजवर जूनमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडने स्वीकारली होती.

२०१८ मध्ये बलुच संघटनेचे अनेक हल्ले
ग्वादरहून बसने डालबाडिनकडे जाणा-या चिनी अभियंत्यांच्या गटावर ऑगस्ट २०१८ मध्ये बलुच लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी हल्ला केला ज्यामध्ये तीन जण ठार झाले होते. तर पाच जण जखमी झाले. याव्यतिरिक्त, नोव्हेंबर २०१८ मध्ये कराची येथील चिनी वकिलातीवरही या गटाने हल्ला केला होता.

भगवान रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरीतला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या