28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींच्या दौ-यापूर्वी पाकिस्तानचा कट फसला ; दोन दहशतवादी ठार

पंतप्रधान मोदींच्या दौ-यापूर्वी पाकिस्तानचा कट फसला ; दोन दहशतवादी ठार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहेत. त्याआधीच सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा कट हाणून पाडला आहे. कुलगाममधील मिरहमा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असून सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी त्यांची नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ रायफल, सात एके मॅग्झिन आणि नऊ ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती देताना काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी असून सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी त्यांची ओळख पटली आहे. हे दहशतवादी २०१८ पासून कुलगाम-शोपियान जिल्ह्यातील भागात सक्रिय होते.

काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पुढे सांगितले की, या दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून त्यात दोन एके-४७, सात एके मॅग्झिन आणि नऊ ग्रेनेडचा समावेश आहे.
दरम्यान, जम्मूच्या बिश्नाह जिल्ह्यातील लालियान गावात एक संशयास्पद स्फोट झाला आहे. शेताच्या मध्यभागी हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या