26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपालघरची घटना दुर्दैवी; मंत्री विजयकुमार गावित

पालघरची घटना दुर्दैवी; मंत्री विजयकुमार गावित

एकमत ऑनलाईन

१०० लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्तींमध्ये रस्ते तयार करणार
मुंबई : पालघरची घटना अत्यंत दुर्दैवी असून यावर तातडीने उपाययोजना म्हणून येत्या दोन वर्षांत राज्यातील १०० लोकसंख्या असलेल्या खेड्यापाड्यांपर्यंत रस्ते तयार करणार आहोत, शंभर पॉप्युलेशनपर्यंत रस्ते उपलब्ध झाले तर अनेक अडचणी सुटतील, जोपर्यंत दळणवळण दिले जात नाही, तोपर्यंत दुर्गम भागातील नागरिकांचा विकास शक्य नाही, असे मत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले.

दरम्यान पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. त्यामुळे आदिवासी दुर्गम भागातील अशा गैरसोयीच्या अनेक घटना मागील काही दिवसांत समोर आल्या आहेत. नुकतेच आदिवासी विकास मंत्रिपदी विराजमान झालेले विजयकुमार गावित हे नाशिकमध्ये होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पालघरची घटना अत्यंत दुर्दैवी असून यासाठी लवकरच ठोस उपाययोजना हाती घेणार आहोत.

ते पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनचा दुर्गम भागातील हा प्रश्न असून तो सोडविण्याचा प्रयत्न करतो आहोत. मागच्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून खासदार हीना गावित यांच्या माध्यमातून केंद्राशी चर्चा करत आहोत.

केंद्र पीएम योजनेच्या माध्यमातून २५० लोकसंख्या असलेल्या खेड्यांपर्यंत रस्ते जोडीला निधी देत आहे. उत्तर महाराष्ट्रात १०० लोकसंख्या असलेल्या वाड्यांना निधी दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील १०० लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्तींमध्ये रस्ते तयार करण्याचा मानस आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या