21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रपंचगंगेच्या पाणीपातळीत २४ तासांत १० फुटांनी वाढ

पंचगंगेच्या पाणीपातळीत २४ तासांत १० फुटांनी वाढ

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल १० फुटांनी वाढ झाली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधा-यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी २४.५ फुटांवर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक मार्ग संततधारेमुळे बंद झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या