24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडापांड्याची वादळी खेळी वाया

पांड्याची वादळी खेळी वाया

एकमत ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाचा विजय, पांड्याचा २३६ चा स्ट्राईक रेट, ७ चौकार, ५ षटकार
मोहाली : मोहालीच्या मैदानात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० षटकांत ६ बाद २०८ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय डावाच्या उत्तररार्धात मैदानात जणू वादळच घोंगावत होते. हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढताना चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या फलंदाजीसमोर कांगारुंच्या बॉलर्सनी अक्षरश: लोटांगण घातले. हार्दिकने आपल्या नाबाद ७१ धावांच्या खेळीत तब्बल ७ फोर आणि ५ षटकार ठोकले. मात्र, ऑस्ट्रेलियानेही जशास तसे उत्तर देत पहिलाच सामना जिंकला. त्यामुळे हार्दिक पांड्याची वादळी खेळी वाया गेली.

मोहालीत हार्दिकने बॉलर्सची जराही गय केली नाही. त्याने आपली नाबाद ७१ धावांची खेळी अवघ्या ३० चेडूत साकारली. त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट २०० च्या पार पोहोचला होता. त्याने कॅमेरुन ग्रीनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तीन बॉलवर सलग तीन सिक्स ठोकून भारताला २०० चा टप्पा पार करून दिला. हार्दिक पांड्याचे आंतरराष्ट्रीय टी २० तील हे आजवरचे दुसरे अर्धशतक ठरले, तर त्याने केलेली नाबाद ७१ धावांची खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-२० खेळी ठरली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करीत सामना फिरविला आणि ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून शानदार विजय मिळविला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या