22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत, ऊन-पाऊस सर्वच पक्षांत सुरू असतो

पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत, ऊन-पाऊस सर्वच पक्षांत सुरू असतो

एकमत ऑनलाईन

पुणे: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नव्या सरकारमध्ये स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात होते. पण त्यांना या सरकारमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादीने त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. त्यामुळे पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार की काय अशी चर्चा सुरू होती. त्यावरही जानकर यांनी भाष्य केले. पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्या भाजपमध्येच राहणार. त्यांच्या वडिलांचे आयुष्य भाजपमध्ये गेले. त्यांचेही गेले आहे. त्या कुठे जाणार नाहीत. त्या भाजप सोडणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षांत सुरू असतो, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले आहे. शिंदे गट आणि भाजपच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. या मंत्र्यांचे खाते वाटपही करण्यात आले आहे. अजून दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना आणि मित्र पक्षांना स्थान देण्यात आले नाही.

त्यामुळे मित्र पक्षांत नाराजी ओढवली आहे. रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यापासून ते राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर भाजपने मात्र थेट काही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पुन्हा एकदा रासप नेते महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप त्यांची मागणी पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच पंकजा मुंडे भाजप सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रासप नेते महादेव जानकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. आम्ही एनडीएत आहोत. आम्ही एनडीए सोडलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटून मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद द्यायचे की नाही हा निर्णय त्यांच्या कोर्टात आहे. मित्र पक्षाला सोबत घ्यावे की घेऊ नये हे भाजपने ठरवावे, असे महादेव जानकर म्हणाले.

शिंदे-फडणवीसांच्या कामांचे कौतुक
यावेळी जानकर यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे. राज्यात चांगली कामे होत आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच पक्ष आणि राज्य पुढे जावे, अशी प्रार्थना बाप्पाला केल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षालाही हवे कॅबिनेट पद : जानकर
राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट पद हवे आहे. अध्यक्ष महादेव जानकर यांनी याविषयीची मागणी पुन्हा उचलून धरली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. त्याआधारे पक्षाला एक कॅबिनेट पद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि सचिवांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मागणी पूर्ण होते का हे लवकरच स्पष्ट होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या