22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडापंतचे भावूक ट्विट

पंतचे भावूक ट्विट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दुस-या क्वालिफायर सामन्यात पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा प्रवास संपुष्टात आला आहे. अशा चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्यात दिल्लीच्या संघाने शेवटच्या दोन षटकांत जोरदार पुनरागमन केले होते. पण पदरी निराशा पडली. या पराभवामुळे कर्णधार रिषभ पंतचे त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्यांदाच जेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर त्याने आपल्या ट्विट आपली भावना व्यक्त केली आहे.

त्याचे हे भावनिक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल २०२१ मधील दुस-या क्वालिफायर मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 3 विकेट्सने निसटता पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणा-या दिल्लीला आयपीएल प्ले ऑफमध्ये सलग दोन पराभव पत्कारावे लागले. त्यामुळे आयपीएल विजेतेपद मिळवण्याचे या टीमचे स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.

सीएसकेच्या अपयशानंतर पंतने ट्विट करत भावना व्यक्त केली आहे. ‘काल रात्री हृदयद्रावक असा शेवट होता. पण असामान्य खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानास्पद असे काहीही असू शकत नाही. आम्ही संपूर्ण हंगामात चांगला खेळ दाखवला.आम्ही आमचे १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. मालक, व्यवस्थापन, कर्मचारी, माझे सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या उत्साही चाहत्यांना मी मनापासून आभार मानू इच्छितो. तुम्ही सर्वांनी हा हंगाम खास बनवला आहे. आम्ही पुन्हा प्रबळ दाव्याने मैदानात उतरु. असे ट्विटमध्ये रिषभने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या