तेहरान : अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पालकांनी त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला कारमध्ये सोडले आणि या दरम्यान कारमध्ये गुदमरून या मुलीचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे त्या कारच्या आतील टेम्परेचर सुमारे ७९ डिग्री सेल्सियस होते. बाहेरचे तापमान ४९ अंशावर होते. तिला कारमध्ये सोडले तेव्हा ती झोपली होती. जेव्हा ती कारमध्ये असल्याचे तिच्या पालकांना समजले तेव्हा ते तिथे पोहचले मात्र तोपर्यंत ती चिमुकली बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. अंगावर थरकाप उडवणा-या घटनेने सोशल मीडियावर हाहाकार माजवला. ही घटना इराण मधील आहे.