38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeउद्योगजगतकोरोना काळात पार्ले-जी ने रचला विक्रम 

कोरोना काळात पार्ले-जी ने रचला विक्रम 

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली :  लॉकडाऊनमुळे अनेक मोठ्या  कंपन्यांचे नुकसान होत असताना मात्र बिस्किट तयार करणार्‍या पार्लेने एक नवीन विक्रम नोंदवला आहे. मागील ८२ वर्षांत पार्ले-जी बिस्किटची इतकी विक्री झाली नाहीत ती विक्री मागील तीन महिन्यात केली आहे. अवघ्या ५ रुपयांत मिळणारे पार्ले-जी बिस्किटाचे पॅकेट शेकडो किलोमीटर चालत जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी उपयुक्त ठरले आहे.

काहींनी स्वत: विकत घेऊन खाल्ले, तर काहींनी मदत म्हणून बिस्किटांचे वाटप केले. तसे पार्ले-जी १९३८ पासून लोकांमध्ये एक आवडता ब्रँड आहे. परंतु लॉकडाऊन दरम्यान त्यांनी आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बिस्किटांची विक्री करण्याचा विक्रम नोंदवला आहे. पार्ले कंपनीने सेल्स क्रमांक जाहीर केला नसला, तरी पण एप्रिल आणि मे हे त्यांच्यासाठी गेल्या ८ दशकातील सर्वोत्कृष्ट महिने असल्याचे ते म्हणाले.एका वृत्तसंस्थेनुसार, पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शहा म्हणाले की, कंपनीचा एकूण मार्केट शेअर सुमारे ५ टक्क्यांनी वाढला आहे आणि यातील ८०-९० टक्के वाढ पार्ले-जीच्या विक्रीमुळे झाली आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने त्यांच्या सर्वाधिक विक्री असणार्‍या आणि कमी किमतीचे ब्रँड पार्ले-जीवर लक्ष केंद्रित केले, कारण ग्राहकांकडून त्याला बरीच मागणी येत होती.

Read More  जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा : कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही

पार्लेसारख्या काही बिस्किट निर्मात्यांनी लॉकडाऊननंतर काही वेळातच कामकाज सुरू केले होते. यापैकी काही कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या येण्या-जाण्याची सोय देखील केली होती, जेणेकरून ते सहज आणि सुरक्षितपणे कामावर येऊ शकतील. जेव्हा कारखाने सुरू झाले, तेव्हा या कंपन्यांचे लक्ष जास्त विक्री असणाऱ्या प्रॉडक्टचे उत्पादन तयार करण्यावर होते.

गेल्या तीन महिन्यांतील लॉकडाऊन दरम्यान अन्य कंपन्यांची बिस्किटेही खूप विकली गेली. तज्ञांच्या मते, ब्रिटानिया गुड डे, टायगर मिल्क बिकिस, बार्बोन आणि मारी बिस्किट्स व्यतिरिक्त पार्लेचे क्रॅकजॅक, मोनॅको, हाइड अँड सीक यांची देखील खूप विक्री झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या