22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयरुग्णांना देणार अमेरिकेहून मागवलेले रेमडेसिवीर औषध

रुग्णांना देणार अमेरिकेहून मागवलेले रेमडेसिवीर औषध

एकमत ऑनलाईन

औषध भारतात वापरण्यास परवानगी देण्यात आली

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालत आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यूही झाला आहे. असे असले तरी अद्याप कोरोनावर कोणतेही औषध किंवा लस मिळाली नाही आहे. दरम्यान अशा परिस्थितीत काही औषधांनी नक्कीच रुग्णांवर चांगला परिणाम होत आहे. त्यापैकी एक औषध म्हणजे रेमडेसिवीर. हे औषध गिलियड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने तयार केलं आहे. आता हे औषध भारतात वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार औषध नियामक मंडळाने याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. यात प्रौढ आणि मुले दोघांचा समावेश आहे. क्लिनरा ग्लोबल सर्व्हिसेस या मुंबईस्थित कंपनीकडून हे औषध अमेरिकेतून आयात केले जाईल. सध्या, कोरोना रूग्णांवर हे औषध केवळ 5 दिवसांसाठी वापरले जाईल. जपानने गेल्या महिन्यातच रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर औषधाच्या वापरास मान्यता दिली होती.जपानने त्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला होता. रेमडेसिवीर हे जपानमधील कोरोनाच्या उपचारांसाठी अधिकृत औषध आहे.

Read More  दिलासादायक : कोरोनाची लस विकसीत करण्यासाठी ३० माकडांवर होणार प्रयोग

सध्या साऱ्या जगाचे लक्ष अँटी-व्हायरल औषध रेमडेसिवीरकडे आहे. सध्या याची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात सुरू आहे. फेज तीनच्या निकालानुसार, 65 टक्के रुग्णांमध्ये या औषधाच्या वापराने 11व्या दिवशी चांगली स्थिती दर्शविली. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉ. फॉसी यांनी या औषधाचे चांगले, प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं सांगितलं. डॉ. फोसे म्हणाले की, अमेरिका, युरोप आणि आशिया मधील 68 ठिकाणी रेमडेसिवीरची चाचणी घेण्यात आली, यात हे दिसून आले की, रेमडेसिवीर औषध कोरोनाला रोखू शकतं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या