25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeऔरंगाबादपवार, दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास ; राजकीय चर्चांना उधाण

पवार, दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास ; राजकीय चर्चांना उधाण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.

दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा काही वेळापूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

राज्यात कालपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच काल शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. यावरून दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा सुरू आहे. ती म्हणजे शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांची. या दोन्ही नेत्यांनी औरंगाबादमध्ये एकाच गाडीतून प्रवास केला आहे.

शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत. गेवराईत आज माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. शिवाजीराव पंडित हे शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा आज गेवराईत होणार आहे. या सोहळ्याला शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच पक्षांतील दिग्गज नेते उपस्थिती लावणार आहेत.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री सुरेश धस, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या