22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना संपवण्याचे काम पवार काका-पुतण्यांनी केले; रामदास कदम ढसाढसा रडले

शिवसेना संपवण्याचे काम पवार काका-पुतण्यांनी केले; रामदास कदम ढसाढसा रडले

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.

५२ वर्षे मी काम केले पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असे कधीच वाटले नव्हते. हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले.

यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला. शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला. मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. ५२ वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होते, वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असे सांगितले होते.

रामदास कदम ढसाढसा रडले
आपल्या मनातली खंत बोलून दाखवताना कदम यांना यावेळी आश्रू अनावर झाले. ५२ वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं हे सांगताना रामदास कदम भावूक होत ढसाढसा रडले.

उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याचा सल्ला
शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत त्यांचीदेखील हकालपट्टी करणार आहात असा प्रश्नदेखील कदम यांनी याावेळी उपस्थित केला. तसेच मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा खोचक टोलादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
राणे, राज ठाकरे, छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी संघर्ष केला आणि ते आज माझी हकालपट्टी करतात. असं म्हणत रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आमदारावरील टीकेवर बोट ठेवले. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर आदित्या ठाकरेंनी किती प्रकारची टीका केली, असे म्हणत त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवावे असे रामदास कदम म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या