22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रपेढे मिळाले नाही म्हणून पवार साहेबांना इतका राग आला

पेढे मिळाले नाही म्हणून पवार साहेबांना इतका राग आला

एकमत ऑनलाईन

मुंबई : काल झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होईल, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, आता पवारांवर भाजपकडून टीकेची झोड उठवली जात आहे.

भाजपाचे निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. निलेश राणे ट्वीटमध्ये म्हणतात की, शरद पवारांना नवे सरकार स्थापन झाल्याचे पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात ते म्हणाले, हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग?, असा म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या