मुंबई : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. पवार उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात पुन्हा दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना १८ जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याआधी शरद पवार यांच्या एक डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे आता ब्रीच काँडी हॉस्पिटलमध्ये दुस-या डोळ्याची शस्त्रक्रिया होणार आहे. आधीची शस्त्रक्रिया सुद्धा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली होती.
मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तब्येत बरी नसताना सुद्धा शरद पवार शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर होते. त्यानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले होते.
याआधीही मार्च महिन्यात शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. शरद पवार यांना पित्ताशयात खडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.