23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeकोरोनाबाधित रुग्णांचा उपचार खर्च द्या

कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार खर्च द्या

एकमत ऑनलाईन

मुरुम : कोरोना विषाणुच्या प्रतिबंधक उपाययोजना देशात सरकारने वेळीच न केल्याने देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उपचाराच्या सोयीअभावी अनेक गरीब बाधित रुग्णांना कर्ज स्वरुपात लाखो रूपया काढून उपचार करावे लागले आहेत. अशा रुग्णांचे तात्काळ पैसे परत द्यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना रुग्ण हक्क परिषदच्या वतीने उमरगा तहसीलदार मार्फत मंगळवारी (दि. २) देण्यात आले. दरम्यान मागणी तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनामुळे सर्व क्षेत्रातील उद्योग बंद असल्याने सर्व सामान्य गरीब नागरिकांना कुठलेही आर्थिक साधन उपलब्ध नाही. शासनाकडून धान्य स्वरूपात देण्यात आलेली मदतीने सर्व जीवनावश्यक गरजा पूर्ण नाहीत. संसार चालविण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अश्यातच अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. शासनाकडून अनेक ठिकाणी उपचारसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने बाधित रुग्णांनी तपासणीसह उपचारसाठी लाखो रुपये कर्ज स्वरुपात घेऊन उपचार मिळविला आहे. तर अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे.

Read More  अभिनेते मनोज तिवारींची भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

सरकारच्या निष्काळजीपणाने नागरिकावर हा संकटाचा प्रसंग आला आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्या रुग्णांनी पैसे भरून उपचार घेतले आहे. अश्या रुग्णाचे पैसे परत द्यावे. खाजगी रुग्णालयात मोफत उपचार द्यावेत. जीवनावश्यक वस्तुसाठी प्रत्येकी दहा हजार द्यावे, कोरोनाची चाचणी व तपासणी मोफत करावी. सर्व प्रकारचे उद्योग व्यवसायांना गती देऊन आर्थिक उत्पन्नचे स्त्रोत तातडीने सुरु करण्यात यावेत, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवदनावर रुग्ण हक्क परिषदचे राज्य उपाध्यक्ष डॉ. खाजालाल ढोबळे, भगत माळी, इमाम टँगे, समीर मुजावर आदींच्या स्वाक्षèया आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या