मुंबई : मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र रायगडहून आले असून या पत्रातून किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांना धमकी मिळण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या पत्रातून किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली असून जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. तसेच, सरकार पडू देत मग बघून घेऊ, असा उल्लेखही या पत्रातून करण्यात आला आहे.
महत्त्वाची आणि खळबळजनक बाब म्हणजे, अजित पवारांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आला आहे.