मुंबई : पाचव्या टप्प्यातील संचारबंदीचे शिथिल केलेले नियम केंद्र सरकारने ३१ मे रोजी जाहीर केले होते. व राज्यांना त्यामध्ये स्वातंत्र्य दिले होते. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राज्य सरकारने हे नियम आज (गुरुवारी) जाहीर केले आहेत. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील आर्थिक घडामोडीही सुरु करण्याच्या दृष्टीने काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत महानगर पालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यास परवानगी शासनाकडून देण्यात आली आहे. या नियमानुसार ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिविली, बदलापूर या मुंबई मधील मेट्रोपोलिटन प्रदेशातील लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवास करता येणार आहे.
Read More रेल्वे स्थानकावरून क्वारंटाइनच्या भीतीने मजुरांचा पळ
दरम्यान, या शिथिल झालेल्या नियमांमुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असून आता हळूहळू दैनंदिन कामे सुरु केली जाणार आहेत. या सुधारित नियमांमध्ये रस्त्याच्या एका बाजूच्या दुकानांना आलटून पालटून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच १०% कार्यक्षमतेसह खाजगी कार्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवणे सोडून इतर कामासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सुधारित नियमांसहित जरी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचीला मिशन बिगिन अगेन असे नाव देण्यात आले आहे.
Inter-district movement of persons within the area of Municipal Corporations under the #Mumbai Metropolitan Region (MMR) will be allowed without any restrictions: Government of Maharashtra pic.twitter.com/yHnqmPxNgt
— ANI (@ANI) June 4, 2020
दरम्यान राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७४ हजार ८६० इतकी झाली आहे. आतापर्यंत २५८७ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तर ३२ हजार ३२९ रुग्ण बरेही झाले आहेत. देशातील रुग्णसंख्या २ लाख १६ हजार ९१९ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असून ते ४८% इतके आहे. सध्या उपचार घेणारे १ लाख ६ हजार ७३७ रुग्ण असले तरी १ लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.