16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रदोन्ही बाजूच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

दोन्ही बाजूच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. ते अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोधच करू. हे जसं आमच्याकडच्यांना लागू आहे तसं त्यांना देखील लागू आहे. आज मला त्यात जायचं नाही. मला असं वाटतं राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरणावर दिली आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, अब्दुल सत्तार बोलले त्याचे मी समर्थन करणार नाही. ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके, उलटसुलट बोलणं हे देखील चुकीचं आहे. तेही समजून घेतले पाहिजे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

पातळी अतिशय खाली चाललेली आहे. राजकारणाची ही पातळी महाराष्ट्रात असू नये असे मला वाटते. त्याकरता जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना सांगत नाहीत तोपर्यंत हे शक्य होणार नाही. अन्यथा नेत्यांनी वेगळे बोलायचे आणि त्यांच्या लोकांनी बोलले की त्यांचे समर्थन करावे. त्यामुळे सगळीकडच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, असे मला वाटते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या