24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रजनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहात आहे

जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहात आहे

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुसळधार पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी १ जूनपासून आतापर्यंत १०२ लोकांचा बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना पूरस्थितीबाबत आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये युवासैनिकांना आवाहन करताना लिहिले आहे, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता जिथे-जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागांत शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदतकार्य करा, असे त्यांनी आवाहन केले आहे. सर्वसामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहात आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची ‘हीच ती वेळ’ आहे, असेही त्यांनी म्हटले.

शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार केले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे या बंडामुळे महाराष्ट्रासह देशातील राजकारणात खळबळ उडाली. या बंडामुळे शिवसेनेचेही मोठे नुकसान झाले आहे.

मात्र, उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा नव्याने ऊर्जा देण्यासाठी जिल्हानिहाय दौरा सुरू केला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. याच अनुषंगाने आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना आवाहन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या