29 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeमहाराष्ट्रड्रोनमध्ये बसून लोक विमानतळावर जातील

ड्रोनमध्ये बसून लोक विमानतळावर जातील

एकमत ऑनलाईन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य
नागपूर : भारतामध्ये सध्या ड्रोन क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी ड्रोनमध्ये बसून लोक विमानतळावर जातील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरमधील पाच हजार तरुणांना लवकरच नोक-या मिळतील, असेही सांगितले.

ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही, जेव्हा चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील, असा नवा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते नागपूरात फॉरच्युन फाउंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांच्या या दाव्याची सध्या चर्चा होत आहे. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, आज शेतीची फवारणी असो अथवा डोंगरावरुन वजनी साहित्य खाली उतरविणे असो… अनेक कामे ड्रोनमुळे कमी पैशात होत आहेत. त्यामुळे भविष्यात ड्रोन क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील.

5 हजार जणांना नोक-या
लवकरच नागपुरातील मिहानमध्ये इन्फोसिसचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे जवळपास ५ हजार नागपूरकरमधील तरुणांना नोक-या मिळतील, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केला.

एक लाख जणांना रोजगार, गडकरींचा संकल्प
नागपूरातील विशेष आर्थिक क्षेत्र मिहानमध्ये ३१ मार्चला इन्फोसिसच उद्घाटन करणार आहे. त्यातून ५ हजार नागपूरकर तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. मिहानच्या माध्यमातून आतापर्यंत ८७ हजार जणांना रोजगार मिळाला असून पुढील लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी १ लाख लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळेल, असा संकल्प केल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या