18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रबुस्टर डोससाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मागितली परवानगी

बुस्टर डोससाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मागितली परवानगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ई कंपनीने करोना लसीकरणातील बुस्टर डोससाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्‍सिन लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तो बुस्टर डोस दिला जाईल. बायोलॉजिकल-ईने कोर्बव्हॅक्‍स ही स्वदेशी बनावटीची लस विकसित केली आहे. त्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्या सध्या सुरू आहेत. आता त्या कंपनीला बुस्टर डोस म्हणून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घ्यायची आहे.

इतर काही देशांनी तिसरा म्हणजेच बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भारतही तसे पाऊल उचलू शकेल, अशी चर्चा ्रआहे. त्यापार्श्‍वभूमीवर, बुस्टर डोसच्या चाचणीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीला महत्व आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या