32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeसरकारकडे मागितली परवानगी : मजुरांसाठी प्रियंका गांधी करणार बसची सोय

सरकारकडे मागितली परवानगी : मजुरांसाठी प्रियंका गांधी करणार बसची सोय

एकमत ऑनलाईन

राष्ट्राच्या उभारणीसाठी महत्वाचं योगदान बजावलेल्या मजुरांना आपण अशा खडतर काळात एकटं सोडू शकत नाही

नवी दिल्ली :  रस्त्याने चालत घरी जात असताना झालेल्या अपघातांमध्ये काही दिवसांपूर्वी मजूरांना आपले प्राण गमवावे लागले होते. अखेरीस प्रियंका गांधी या मजुरांसाठी धावून आल्या आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र
प्रियंका गांधी यांनी मजूरांना आपल्या घरी आणण्यासाठी 1 हजार बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठीचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल फक्त यासाठी उत्तर प्रदेश सरकारने परवानगी द्यावी म्हणून प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीलं आहे.

Read More  संरक्षण क्षेत्रात 74 % FDI,तर कोळसा उद्योगाला 50 हजार कोटी 

500 बस चालवण्याची तयारी
गाझिपूर आणि नोएडा परिसरातून दररोज 500 बस चालवण्याची तयारी काँग्रेस पक्षाने घेतल्याचं प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी महत्वाचं योगदान बजावलेल्या मजुरांना आपण अशा खडतर काळात एकटं सोडू शकत नाही, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या