24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयपेट्रोल-डिझेल स्वस्त

पेट्रोल-डिझेल स्वस्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने शनिवार दि. २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ आणि सहा रुपयांनी कपात केली. यानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर(१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मात्र, या निर्णयामुळे माता-भगिनींची विस्कटलेली आर्थिक गणितं स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये १२३.४६ रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल १०७.६१ रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर असून, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा आजचा दर ९६.६७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १०४.७७ रुपये दराने विकले जात आहे. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या