28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयकुनो पार्कमध्ये मोदींची फोटोग्राफी

कुनो पार्कमध्ये मोदींची फोटोग्राफी

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते सोडण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे चित्ते अभारण्यात सोडण्यात आले आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या नव्या पाहुण्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. मोदींनी पटकन एकावर एक क्लिक करत अभयारण्यात जाणा-या या नव्या पाहुण्यांचे फोटो काढले. हे चित्ते काही दिवस अभारण्याच्या विशिष्ट परिसरात ठेवण्यात येणार आहेत.

त्यांना या जंगलातील हवा आणि पाणी मानवते की नाही याचा काही दिवस अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात मुक्त संचारासाठी सोडण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामिबियातून भारतात चित्ते आणण्यात आले आहेत. भारतातून चित्ते लुप्त झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतात चित्त्यांची डरकाळी पाहायला मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या