मुंबई – राज्यात आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत आलेली मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये कपड्यांवरून चांगलीच जुंपली आहे. यामुळे चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीसही आली आहे. परंतु याच मुद्यावर पत्रकार परिषद घेणे चित्रा वाघ यांच्यापुढे अडचणी निर्माण करणारे ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आचारसंहिताभंगाची तक्रार करण्यात आल्यामुळे चित्रा वाघच्या अडचणी वाढू शकतात. मराठवाड्यात शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यालाही ती आचारसंहिता लागू असताना चित्रा वाघ यांनी तुळजाभवानी मंदिरात भाजपचे पदाधिकारी यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
चित्रा वाघ सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मंदिरात भाजपचे पदाधिकारी यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत आली आहे. दिवसेंदिवस भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद चिघळत चालला आहे.