22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeपायलट झोपले, लँडिंग करायचेच विसरले!

पायलट झोपले, लँडिंग करायचेच विसरले!

एकमत ऑनलाईन

आदिस अबाबा : दोन इथिओपियन एअरलाईनचे वैमानिक सुदानच्या खारतोऊम ते इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा उड्डाणादरम्यान झोपी गेले, त्यामुळे त्यांचे लँडिंग हुकले. हा संपूर्ण प्रकार सोमवारी झाल्याचे हेराल्ड एव्हिएशनने सांगितले.

ज्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलला फ्लाईट क्रमांक इटी ३४३ विमानतळाकडे येत असल्याचे दिसले. मात्र ते लँडिंगच्या दृष्टीकोनातून ते कोणतीच हालचाल करताना दिसत नव्हते. दरम्यान, बोईंग ७३७ विमान ऑटोपायलट मोडला टाकून दोन्ही वैमानिक झोपी गेले होते. त्यांनी विमान ३७ हजार फुटावर ठेवले होते.
झोपी गेलेल्या वैमानिकांशी एअर ट्रॅफिक कंट्रोलने संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला.

मात्र त्यांना यात काही यश आले नाही. विमान विमानतळावर लँड होण्याऐवजी ते पुढे निघून गेले. दरम्यान, ऑटो पायलट मोड डिसकनेक्ट झाला आणि विमानात अलार्म वाजण्यास सुरूवात झाली. त्यानंतर झोपी गेलेले वैमानिक खडबडून जागे झाले. त्यानंतर या वैमानिकांनी पुन्हा विमानाचा ताबा घेऊन जवळपास २५ मिनिटांनी धावपट्टीवर विमान लँड केले.

सर्वेलन्स सिस्टमच्या डाटावरून विमान धावपट्टीवरून लँड न होताच पुढे गेल्याचे सिद्ध झाले आहे. विमानाच्या मार्गाचा फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, उड्डाण विश्लेषक अ‍ॅलेक्स माचेरास यांनी देखील ट्विटरवर या घटनेबाबत पोस्ट केली. याचबरोबर त्यांनी वैमानिकाच्या मानसिक ताणावरही बोट ठेवले. अशाच प्रकारची घटना मे महिन्यात घडली होती. न्यूयॉर्क ते रोम दरम्यानच्या फ्लाईटचे वैमानिक विमान ३८ हजार फुटावरून जात असताना झोपी गेले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या