सोलापूर : कवठे (ता.उत्तर सोलापूर) येथील आश्रम शाळेच्या आवारात संतोष महादेव पाटील (वय २१ रा.नीलम नगर, एमआयडीसी) या वॉचमनने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही घटना शुक्रवारी (ता. 22) दुपारच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोकेदुखीच्या आजारास कंटाळून त्याने हा प्रकार केला अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.