27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या साता-यातील बंगल्यावरील पोलिस बंदोबस्त हटवला !

शिंदेंच्या साता-यातील बंगल्यावरील पोलिस बंदोबस्त हटवला !

एकमत ऑनलाईन

सातारा : बंडाचे निशाण फडकावून शिवसेना महाविकास आघाडी सरकारला तगडा झटका देऊन गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका बसला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी असलेल्या बंगल्याला असलेला बंदोबस्त पोलिसांनी काढला आहे. पेट्रोलिंग करत बंगल्यावर पोलिसांची नजर असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.
दरम्यान, गावातील घराचा बंदोबस्त हटवण्यात आल्यानतंर राजकारण सुरू झाल्याची चर्चा गावामध्ये सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे नेहमी येणे-जाणे असते.

शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ला चढवला जात आहे. अनेक ठिकाणी बॅनरही फाडून टाकले आहेत. बॅनरना काळंही फासलं जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने बंडखोर आमदारांनी चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या