26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeराष्ट्रीयपोलिसांनी कापले ९१०० चे चलन!

पोलिसांनी कापले ९१०० चे चलन!

एकमत ऑनलाईन

लखनो : एका तरुणाला स्टंट करणे जिवाशी आले आहे. सध्या असाच एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरुण गाडीवर स्टंट करताना दिसत आहे.

व्हीडीओमध्ये एक तरुण वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत गाडीवर आडवा बसून गाडी चालवताना दिसत आहे. या तरुणाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यावर कारवाई केली असून त्याला अटक केली आहे.

त्याचबरोबर त्याच्याकडून ९ हजार १०० रुपयांचे चलन कापले आहे. त्यामुळे या तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील हा व्हीडीओ असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडीओला नेटक-यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओवर नेटक-यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हीडीओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या