32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयपोलीस अधिकाऱ्याकडे आढळली 70 कोटींची बेकायदेशीर संपत्ती

पोलीस अधिकाऱ्याकडे आढळली 70 कोटींची बेकायदेशीर संपत्ती

एकमत ऑनलाईन

तेलंगानाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचे एसीबीला आढळले. एसीपी येल्माकुरी रेड्डी यांच्याकडे जवळपास 70 कोटी बेकायदेशीर मालमत्ता आढळली आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रेड्डी यांनी भ्रष्टाचार आणि संशयास्पद मार्गाने ही मालमत्ता जमवली आहे. एसीपी रेड्डी हे रचाकोंडा पोलीस कमिश्नरेट अंतर्गत मलकाजगिरी डिव्हिजन येथे नियुक्त आहेत. एसीपीच्या या संपत्तीची सरकारी किंमत 7.5 कोटी रुपये आहे. मात्र स्थानिक बाजार भावानुसार किंमत 70 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर एसीबीने हैदराबाद, जनगाव, नालगोंडा, करीमनगर जिल्हा आणि आंध्र प्रदेशच्या अनंतपुर जिल्या अशा 25 ठिकाणी छापेमारी केली.

सर्च ऑपरेशनमध्ये अधिकाऱ्यांना अनंतपुरमध्ये 55 एकर शेतजमीन, मधेपुरमध्ये सायबर टॉवर्ससमोर 1960 चौरस यार्डचे 4 प्लॉट, 2 आणखी प्लॉट, हफिजपेट येथे 3 मजली कमर्शियल बिल्डिंग, 2 घरे, 15 लाख रुपये रोख रक्कम, दोन बँक लॉकर्स, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आणि इतर व्यवसाय आढळले. सध्या सर्च ऑपरेशन सुरू असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती एजेंसीने दिली.

तीन हजारात अंगणतीन हजारात अंगणवाडी आयएसओ माळशिरस तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या