27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्र‘अफझल खानाचा वध’ या देखाव्याला पोलिसांची परवानगी

‘अफझल खानाचा वध’ या देखाव्याला पोलिसांची परवानगी

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील एका गणपती मंडळाच्या जिवंत देखाव्यावरून वाद पेटला होता. अफझल खानाचा वध या जिवंत देखाव्याला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अस्े नकाराचे कारण देण्यात आले होते. मात्र आता याच देखाव्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास भारतात नाही तर पाकिस्तानात दाखवायचा का? असा प्रश्न मंडळाकडून निर्माण करण्यात आला होता. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे या संदर्भात मेलद्वारे संपर्क करून निवेदन पाठवले होते. अखेर मंडळाच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

सध्या पुण्यात ब्राह्मण महासंघ अनेक प्रश्नांच्या बाबतीत चांगलेच सक्रिय झाले आहे. या देखाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी देखील आज कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन दिले होते. या देखाव्यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता होती. अनेक स्तरांवर या देखाव्यासंदर्भात बोलले गेले होते. मात्र आता हे गणपती मंडळ अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा साकारणार असल्याचे, मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंनीदेखील प्रश्न उपस्थित केला होता.
शिंदे-फडणवीस सरकारकडून वारंवार हिंदुत्ववादी सरकार असल्याचे भाष्य केले जात होते. याच सरकारमध्ये जर शिवरायांच्या प्रतापाचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध होत असेल तर ही गोष्ट फार चिंताजनक आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवता मग महाराजांचा इतिहास दाखवायला विरोध का करता?, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या