24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील भाजप कार्यालयांना पोलिस संरक्षण

राज्यातील भाजप कार्यालयांना पोलिस संरक्षण

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच हे सरकार पडावे यासाठी दररोज देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपला आता सरकार पाडण्याची आयतीच संधी चालून आली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात विचित्र परिस्थिती राज्यांमध्ये निर्माण झाली आहे.

त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून भाजपची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. आमदार संजय कुटे हे स्वत: एकनाथ शिंदे यांना सुरतमध्ये हॉटेलमध्ये भेटले होते. शिवसेना आमदारांना सुरतवरून गुहावटीमध्ये येण्यासाठी मोहित कंबोज यांची पळापळ दिसून आली होती. हे सरकार पाडण्यासाठी भाजप ने जे काही करता येईल ते सर्व पणाला लावून करण्यास सुरुवात केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप कार्यालये शिवसैनिकांकडून लक्ष्य ठरू शकतात ही शक्यता गृहित धरुन राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. शिवसैनिकांचा उद्रेक होऊ शकतो ही शक्यता त्याच्यामागे वर्तवली जात आहे. त्यामुळेच सर्व कार्यालयांना संरक्षण दिल्याचे दिसून येत आहे.

कालपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, इतकेच नव्हे तर शिवसेना भवनासमोरही बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही काळामध्ये शिवसैनिकांच्या रागाचा सामना भाजप नेत्यांनाकिंवा भाजप कार्यकर्त्यांना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या