Saturday, September 23, 2023

६० वर्षीय महिलेची हत्या करुन तिचे शीर घेऊन पोलीस गाठले ठाणे

ओडिशा : ओडिशामधील मायुरभांज जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३० वर्षाच्या व्यक्तीने ६० वर्षीय महिलेची हत्या करुन तिचे शीर घेऊन पोलीस ठाणे गाठले. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस ठाणे हादरुन गेले आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; ओडिशामधील मायुरभांज जिल्ह्यामध्ये बुद्धूराम सिंग आणि त्याची मामी चंपा सिंग हे दोघे एकाच घरात राहत होते. दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास बुद्धूराम आपल्या मामीच शीर हातात घेऊन १३ किलोमीटरवर असणाऱ्या कुंथा पोलीस स्थानकामध्ये दाखल झाला आणि पोलिसांची एकच धावपळ सुरु झाली. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपीला जाब विचारला असता, ‘माझी मामी जादूटोणा करते आणि त्यामुळेच तीन दिवसांपूर्वी माझ्या मुलीचा मृत्यू झाला. याच रागातून मी तिची हत्या केली आहे’, असे बुद्धूराम यांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचे धड ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; चंपा या अंगणामध्ये झोपल्या असतानाच बुद्धूरामने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने तिचे शीर धडापासून वेगळे करुन गमच्छामध्ये बांधले आणि तो पोलिसांकडे आला. हा हल्ला झाला त्याठिकाणी अनेक जण उपस्थित होते. मात्र, कोणीही बुद्धूरामला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

Read More  प्रेत वाहून गेलं : नदीपात्रात अंत्यसंस्कार सुरु असताना अचानक पाण्याचा लोंढा

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या