25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home महाराष्ट्र 12500 पदांसाठी होणार पोलीस भरती; महाराष्ट्र सरकारने घेतला निर्णय

12500 पदांसाठी होणार पोलीस भरती; महाराष्ट्र सरकारने घेतला निर्णय

एकमत ऑनलाईन

मुंबई -कोरोना व्हायरस महामारीमुळे केंद्रापासून ते राज्य सरकार अनावश्यक खर्चात कपात करत आहे. सोबतच तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी देखील उपलब्ध केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ संवर्गातील 12,500 पदांच्या मेगा भरतीच्या प्रस्तावाला आज मंजूरी दिली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की पोलीस दलातील 12500 जागांसाठी भरती केली जाईल. पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ संवर्गातील १२, ५२८ रिक्त पदांसाठी १००% मेगा भरती राबविण्याच्या अत्यंत महत्वपूर्ण प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. या निर्णयामुळे राज्यातील हजारो होतकरू मुला-मुलींना दिलासा मिळणार आहे.

याआधी जुलैमध्ये अनिल देशमुख यांनी राज्य सरकार पोलीस दलामध्ये 12,538 पदांसाठी भरती करणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण प्रक्रिया पार पडेल असे त्यांनी सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पोलिस दलावरील तणाव कमी करण्यासाठी 10,000 शिपाई पदाची भरती केली जाणार असल्याचे म्हटले होते. कोरोना संकटाच्या काळात एकीकडे बेरोजगारीमध्ये वाढ होत असताना सरकारच्या या मेगा भरतीमुळे तरूण-तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

सांगोला साखर कारखाना सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या