26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे गटाकडून केंद्रीय पातळीवर वर्चस्वाची लढाई लढली जात आहे. त्यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण शिंदे गटानं सादर केलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही बदल सुचवलेत. त्यामुळे हे पत्र पुन्हा एकदा सादर करावे लागणार आहे.

जे १२ खासदार आमच्यासोबत आहेत म्हणून त्यांना एक वेगळा गट म्हणून मान्यता मिळावी यासाठी या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना तसे अधिकृत पत्र जाणे गरजेचे आहे. कालपासून याबाबत चर्चा सुरु होती की, बारा खासदार सोबत आहेत त्यांच्या सहीचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले जाईल. आधीची वेळ सकाळी साडेदहा वाजता ठरली होती. पण हे पत्र अधिकृरित्या दिल्याचं अद्याप तरी सांगण्यात आलेलं नाही.

मुख्य प्रतोद भावना गवळी यांच्या नावानं हे पत्र देण्याची सूचना लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. कारण लोकसभेत शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत आहेत. ते शिंदे गटासोबत नाहीत. त्यामुळे नवीन गटनेता निवडण्याच्या हालचाली सुरु आहेत.

राहुल शेवाळेंना गटनेतेपद देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण त्याआधी जे पत्र द्यायचं आहे ते चीफ व्हिपच्या नावानं देण्याची गरज आहे. पण शिवसेनेनं गवळी यांना हटवून खासदार राजन विचारे यांनी चीफ व्हीपपदी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळं नवा घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून लोकसभा सचिवालयानं ही सूचना केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या