18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात राजकीय अस्थिरता वाढणार ; ज्योतिषाचार्यांचे भाकित

राज्यात राजकीय अस्थिरता वाढणार ; ज्योतिषाचार्यांचे भाकित

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे गटातल्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये, राज्यातले प्रकल्प बाहेर गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर होणारी टीका अशा अनेक कारणांमुळे राज्यात सध्या सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. राजकीय गदारोळ माजलेला असताना आता राज्यात सत्तापालटाचे भाकित ज्योतिषाचार्यांनी वर्तवले आहे.

राज्यात राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा सगळा सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा परिणाम असल्याचेही धारणे यांचे म्हणणे आहे. २९ वर्षांपूर्वी अशाच संयोगामुळे केंद्र सरकार अस्थिर झाले होते, असेही या ज्योतिषाचार्यांनी म्हटले आहे.

राज्यात राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा सगळा सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा परिणाम असल्याचेही धारणे यांचे म्हणणे आहे. २९ वर्षांपूर्वी अशाच संयोगामुळे केंद्र सरकार अस्थिर झाले होते असेही या ज्योतिषाचार्यांनी म्हटले आहे.

१५ दिवसांच्या अंतराने सूर्य आणि चंद्र ग्रहण आले आहे. त्याच्या परिणामामुळे राज्यात राजकीय अस्थिरता येईल, असे भाकित धारणे यांनी केले आहे. त्यामुळे आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत देण्यात येत आहेत. पुढच्या ४० ते ५० दिवसांच्या काळात राज्यातली राजकीय अस्थिरता आणखी वाढेल, असे भाकित धारणे यांनी वर्तवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या