23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीय  दीड वर्षात १० लाख नोक-यांचा राजकीय अन्वयार्थ ; ६ विधानसभा,...

  दीड वर्षात १० लाख नोक-यांचा राजकीय अन्वयार्थ ; ६ विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी साखर पेरणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठी घोषणा केली. पुढील दीड वर्षात १० लाख बेरोजगारांना सरकारी नोकरी मिळणार असल्याचे जाहीर केले.यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून एक ट्विट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील १.५ वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख तरूणांची भरती करावी, असे निर्देश दिल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारला ८ वर्ष झाली आहेत. अशातच अचानक मोदींनी सरकारी नोकरी संदर्भात ट्विट करून आनंदाची बातमी दिली. मोदींच्या या निर्णयामागचे नेमके पॉलीट्रिक्स काय आहेत, हे देखील या निमित्ताने समजून घेणे गरजेचे ठरते.

आगामी निवडणुकीचा विचार करता लोकसभा निवडणुकीला अद्याप २ वर्षाचा कालावधी आहे. २०२४ साली लोकसभा निवडणूक होणार आहे. पण यापूर्वी देशातील ११ राज्यात विधानसभा निवडणूक होतील. मोदींनी लोकसभेच्या सोबतच या विधानसभा निवडणुकीचा विचार करून ही घोषणा केली असावी, असे गृहित धरण्यास पुरेसा वाव आहे.

सरकारने १० लाख नोक-यांचे टार्गेट डिसेंबर २०२३ पर्यंत ठेवले आहे. लोकसभेची निवडणूक २०२४ मध्ये होईल. दरम्यान, या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड यांसह अन्य महत्त्वाच्या राज्यात निवडणुका होऊ जाणार आहेत.

२०२४च्या लोकसभेच्या दृष्टीने राज्यातील विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळेच मोदींनी योग्य वेळी सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली असेही म्हणता येईल. गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगारीच्या मुद्यावर विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. अशातच सरकारकडून इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरतीला हिरवा कंदील देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या