लोकसंख्यावाढीवरून भाजपमध्ये जुंपली
लखनौ : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठ विधान केले होते. योगींच्या विधानानंतर भाजप नेते आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी विरोधी दर्शविणारे ट्विट केलं आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या मुद्दावरून भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करत असतानाच समाजातील लोकसंख्येचे संतुलन बिघडू नये याकडेही लक्ष दिले पाहिजे. विशिष्ट वर्गाची लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि इथल्या मूळ लोकांची लोकसंख्या कमी होईल, असं व्हायला नको, असं योगींनी म्हटले.
योगी पुढं म्हणाले की, ज्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, तिथे लोकसंख्येचा असमतोल चिंतेची बाब बनला आहे. याचा विविध धर्मांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे काही काळानंतर अराजकता निर्माण होते.
दुसरीकडे भाजपनेते नक्वी यांनी ट्विट करून म्हटले की, लोकसंख्येचा विस्फोट धार्मिकतेचा मुद्दा नसून देशाची समस्या आहे. त्याला जात-धर्माशी जोडणे योग्य नाही. नुकताच केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणारे नकवी यांचे हे योगी यांच्या विधानानंतर आलं आहे. नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून भाजप त्यांना उपाराष्ट्रपती पदाचा उमेदवार बनविण्याची शक्यता आहे.