24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयरेस्टॉरंट, जिम, कॅफे, हॉटेल या ठिकाणी लाटेची शक्यता

रेस्टॉरंट, जिम, कॅफे, हॉटेल या ठिकाणी लाटेची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना महामारीला १० महिने झालेत आणि आपण मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे याला सरावलो आहोत. आता आपण घराबाहेर पडतोय, बाहेर खायलाही सुरुवात केली आहे. पण कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत. लॉकडाउनमध्ये सूट मिळाल्यानंतर महत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडणारे लोक आता अधिक प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.

नेचर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कोविडची लागण होण्याचा धोका अधिक आहे. अशा ठिकाणांची यादी दिली आहे. मोठ्या शहरांतल्या छोट्या-छोट्या ठिकाणी माणसे वारंवार जातात अशा ठिकाणी संसर्गाचा धोका मोठा आहे. रेस्टॉरंट, जिम, कॅफे, हॉटेल या ठिकाणी बसण्याची मर्यादा कमी केल्यास संसर्ग खूप कमी होईल असे, या अभ्यासात म्हटलंय. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विषयाचे असोसिएट प्रोफेसर आणि या अभ्यासातील संशोधक ज्युर लेस्कोव्हेक यांनी सीएनएनला सांगितले, आमच्या मॉडेल अभ्यासानुसार गर्दीच्या जागी २० टक्के बंधने वाढवली तर संसर्ग ८० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. पण असे केले़ तरीही नेहमी जेव्हा ही हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू असतात त्याच्याशी तुलना केली़ तरीही त्यात फक्त ४० टक्के ग्राहकांनाच अटकाव होते. म्हणजे नेहमीच्या तुलनेत ६० टक्के लोक येताततच.

हे ही मास्क धुवून उन्हात ठेवला तर ९९.९९ टक्के कोरोनाचे विषाणू नष्ट होतात?
अमेरिकेतील १० मोठ्या मेट्रोपोलिटन भागांतील कोविडच्या संभाव्य संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी या संशोधकांनी मोबाइल फोनच्या लोकेशनचा डाटा वापरला. रेस्टॉरंट, कॅफे, किराणे दुकाने, जिम, हॉटेल, दवाखाने, प्रार्थनास्थळे या ठिकाणी जाणाºया लोकांचा आणि कोरोना संसर्गाचा अभ्यास त्यांनी केला. मेट्रो शहरांतील पूर्ण सुरू झालेली रेस्टॉरंट, जिम, हॉटेल, कॅफे, प्रार्थनास्थळे, मर्यादित सेवा देणारी रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेनी सुरू झाली तर या सर्व ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.

आमच्या मॉडेलनुसार किराणा दुकानात गरिब माणूस एकदा गेला तर ते त्याला श्रीमंत माणसाच्या तुलनेत दुप्पट धोकादायक आहे, असेही ज्युर यांनी सांगितले. झोपडपट्टीतील दुकाने किंवा घरांमध्ये जागा कमी उपलब्ध आहे आणि गर्दी जास्त आहे़ त्यामुळे ही ठिकाणे अधिक धोकादायक ठरू शकतात, असेही या अभ्यासातले निरीक्षण आहे. तरीही, या अभ्यासातही त्रुटी आहेत. हा सर्वसमावेशक अभ्यास नाही. याचे मॉडेल सिम्युलेशन आहे आणि हा डाटाही फक्त एकाच देशातल्या १० मेट्रोसिटींमधला आहे. तुरुंग, सोसायट्या, नर्सरी, नर्सिंग होम, शाळा, आॅफिसे या संसर्गाची शक्यता असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांचा अभ्यास यात करण्यात आलेला नाही़

नितीशकुमार दगाफटका करण्यात माहिर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या