23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रप्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली

प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली

एकमत ऑनलाईन

पुणे : प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी दिली आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांना २७ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती बिघडल्याने सर्व व्हिजिटर्सना प्रवेश बंद केला आहे. तसेच, डॉक्टरांनी फोन करून तब्येत विचारू नये. वेळोवळी डॉक्टरांकडून अपडेट कळवले जातील, अशी सूचनादेखील दिली असल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा.

पण, भेटीची अपेक्षा आणि आग्रह करू नये, असे अनिकेत आमटे यांनी म्हटले आहे.
मागील आठवड्यात म्हणजेच १३ जूनदरम्यान, डॉ. आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. म्हणून त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. न्युमोनिया बरा झाल्यानंतर आता कर्करोगावरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या