कोरोनाला पोषक ठरेल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आवाहन
लातूर : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत लातूर मध्ये कोणतीही कोरोनाला पोषक ठरेल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुस्लीम बांधवानी आपल्या परिवारासोबतच घरी राहून रमजान ईद साजरी करावी. व नमाज करीता एकत्रित न येता आपल्या घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ईद निमित्त आयोजित धर्म गुरुंच्या बैठकीत केले.
येत्या काही दिवसात रमजान ईद असल्या कारणास्तव लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने धर्म गुरुंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लातूरमधील सर्व मुस्लीम धर्मीय धर्मगुरु उपस्थित होते.यावेळी सर्व धर्म गुरुंनी प्रशासनाचे जे नियम असतील ते नियम पाळूनच मुस्लीम समाज आपल्या घरीच राहून ईद साजरा करेल असे सांगितले. तसेच फिजीकल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन केले जाईल. कोणीही एकत्रित कोणत्याही ठिकाणी जमा होणार नाहीत असे सांगितले, तसे आवाहन ही सर्व मस्जिदीमधून यापुढे केले जाईल.
Read More राज्य सरकार १५ जूनपासून शाळा सुरु करण्याच्या विचारात
प्रशासनाला सहकार्य करु असे मत व्यक्त केले. यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, लातूर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, जिल्हा प्रशासन अधिकारी सतिश शिवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.