24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडादोन मुलांची आई असलेल्या प्रीती म्हस्केंचे नाव गिनीज बुकात..!

दोन मुलांची आई असलेल्या प्रीती म्हस्केंचे नाव गिनीज बुकात..!

एकमत ऑनलाईन

पुणे : दोन मुलांची आई असलेल्या महिलेने सायकलिंगमध्ये अनोखे रेकॉर्ड केले आहे. ५६ तासांपेक्षा कमी वेळेत लेह ते मनाली सायकल चालवून हे रेकॉर्ड करण्यात आले आहे.
या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.

प्रीती म्हस्के असे या दोन मुलांची आई असलेल्या सायकलिस्टचे नाव आहे. त्या पुण्यातील आहेत. लेह ते मनाली असा प्रवास त्यांनी एकट्याने पूर्ण केला आणि जागतिक विक्रमाला गवसणी घातली.

२२ जून रोजी लेहपासून मनालीपर्यंत सायकलिंग सुरू केलेल्या प्रीती म्हस्के यांनी ४३० किलोमीटरहून अधिक अंतर कापून शुक्रवारी ५५ तास १३ मिनिटांत आपले ठिकाण गाठले. विक्रम करण्यासाठी त्यांच्याकडे ६० तासांचा अवधी होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ६० तासांचा अवधी दिला होता.

बीआरओने दाखवला हिरवा झेंडा
प्रीती म्हस्के यांच्या या प्रवासाला २२ जून रोजी लेहमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे मुख्य अभियंता ब्रिगेडियर गौरव कार्की यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि २४ जून रोजी मनाली येथे इफडच्या 38 बॉर्डर रोड टास्क फोर्सचे कमांडर कर्नल शबरिश वाचाली यांनी स्वागत केले.

मार्ग आव्हानात्मक : म्हस्के
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स लेह ते मनाली हा मार्ग आव्हानात्मक आहे. भूप्रदेशाची उंची आणि सतत बदलत असलेले हवामान यामुळे विक्रम करणे आव्हानात्मक होते. हा विक्रम ५५ तास, १३ मिनिटे आणि ० सेकंदात पूर्ण करू शकले, असे त्यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले.

बीआरओकडून कौतुक
शाब्बास प्रीती मस्के.. जागतिक अल्ट्रा सायकंिलग रेकॉर्डचा यशस्वी प्रयत्न केला. प्रीती यांनी लेह ते मनालीपर्यंतची ४८० किमीची अवघड सायकंिलग मोहीम ५५ तास १३ मिनिटांत पूर्ण केली. त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात चार पर्वतीय मार्ग पार केले, असे ट्विट करत बीआरओने म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या