21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत तिसऱ्या बुस्टर मात्रेची तयारी

अमेरिकेत तिसऱ्या बुस्टर मात्रेची तयारी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : कोरोना प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी बारा महिन्यांनी लसींची तिसरी मात्रा देणे शक्य व्हावे, या हेतूने अमेरिकेतील फायझर कंपनी पुढील महिन्यात परवानगीसाठी अर्ज करणार आहे. अनेक देशातील संशोधनानुसार कोविड १९ लसी डेल्टा विषाणू विरोधात संरक्षण देत आहेत. आता हा विषाणू जगात पसरला असून, अमेरिकेत काही जणांना हा संसर्ग झाला आहे. फायझर लसीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यामुळे कोरोना विषाणूविरोधात प्रतीपिंड तयार होतात. डेल्टा विषाणू विरोधातही यात प्रतीपिंड तयार होतात.

जगातील अनेक लोकांना अजून पहिली मात्राही मिळाली नसून फायझरने तिसऱ्या बुस्टर म्हणजे वर्धक लसीच्या परवान्यासाठी मागणी केली आहे. कालांतराने प्रतिपिडांची संख्या कमी होत असते. त्यामुळे वर्धक लस मात्रेची गरज आहे असे फायझरचे म्हणणे आहे. फायझरचे मिलाएल डोल्टसन यांनी सांगितले, की तिसºया लसींच्या मात्रेनंतर व्यक्तींमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण हे पाच ते दहा टक्के वाढत असते. ऑगस्टमध्ये फायझर लसीच्या तिसºया मात्रेच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लशीच्या दोन मात्रा प्रतिपिंड वाढवण्यासाठी गरजेच्या असतात. सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंपासून त्यामुळे संरक्षण मिळते. केवळ डेल्टाच नव्हे तर इतर विषाणूंनाही प्रतिकार केला जातो. ऑगस्टमध्ये फायझर कंपनी ही तिसºया बुस्टर लसीच्या मात्रेसाठी परवानगीकरिता अर्ज करणार आहे.

फायझर लस ही डेल्टा विषाणूवर परिणामकारक
ब्रिटन व इस्रायल या देशांमध्ये फायझर लस ही डेल्टा विषाणूवर परिणामकारक ठरली असल्याचे डोल्टसन यांनी म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मिळणे ही कुठल्याही लसींच्या वापरातील पहिली पायरी असते, असे व्हँडर बिट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे डॉ. विल्यम शाफनर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत ४८ टक्के लोकांच्या लसीकरण
अमेरिकेत सध्या तरी एकूण लोकसंख्येच्या ४८ टक्के लोकांचे लसीकरण झाले असून देशाच्या काही भागात डेल्टाचा प्रभाव वाढत असून, तेथील परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. सेंटर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेच्या डॉ. रॉशेली वॅलेन्स्की यांनी सांगितले की, अमेरिकेत मिडवेस्ट भागात डेल्टा विषाणूचा प्रसार ८० टक्के असून काही भागात तो ५० टक्के आहे.

शालेश शिक्षण मंत्र्यांच्या गाडीला अपघात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या