महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता- तृप्ती देसाई

  335
  4 मे ला दारूची दुकानं सुरू केल्यापासून गर्दीमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली

  पुणे  : कोरोना पेशंटची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

  4 मे ला दारूची दुकानं सुरू केल्यापासून गर्दीमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली तसेच राज्यात गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत चाललं आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन हजाराहून जास्त पेशंट सापडत आहेत, असं तृप्ती देसाईंनी सांगितलंय. ज्या पद्धतीने कोरोनाचे पेशंट वाढत आहेत असेच पेशंट जर पुढील दहा दिवसात वाढत राहिले तर राज्य सरकारला ही परिस्थिती नियंत्रणात आणता येणार नाही. म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता महाराष्ट्रात नाकारता येणार नाही, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

  Read More  सीमेवर काम थांबणार नाही!

  दरम्यान, आपल्या देशात कोरोनाचे पेशंट महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहेत. महाराष्ट्रात सध्या 50 हजाराहून जास्त कोरोनाच्या पेशंटची संख्या झाली आहे. तसेच मृत्यूचं प्रमाणही दीड हजारापेक्षा जास्त आहे.