22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’च्या दारात सुख-शांती दाबून दे ; शहाजी बापूंचे गणरायाकडे साकडे

‘मातोश्री’च्या दारात सुख-शांती दाबून दे ; शहाजी बापूंचे गणरायाकडे साकडे

एकमत ऑनलाईन

पंढरपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे. या आमदारांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दणका दिला. उद्धव ठाकरेंपासून हे आमदार वेगळे झालेले असले तरी उद्धव ठाकरे यांच्यावरील त्यांचे प्रेम काही अटलेले नाही.

आजही शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंबद्दल आदर दाखवत असतात. डोंगर, झाडी, हाटील फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहेत. शहाजी बापू पाटील यांनी थेट ‘मातोश्री’च्या सुख-समृद्धीसाठी गणरायाला साकडे घातले आहे. मातोश्रीच्या दारात सुख शांती दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी, आनंदी ठेव, अशी प्रार्थना शहाजी बापू पाटील यांनी गणरायाकडे केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहाजी बापू पाटील यांनी अचानक केलेल्या या प्रार्थनेचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.

विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या राहत्या वाड्यामध्ये देखील गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहाच्या भरामध्ये पाटील कुटुंबाने गणरायाचे स्वागत केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या