Tuesday, October 3, 2023

चक्क सोन्याचा मास्क

पुणे  : पुण्यातील गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मास्क वापरणे आवश्यक असल्यामुळे शंकरकुराडे यांनी चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. एकीकडे सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढत होत चालली असताना, अशाप्रकारे सोन्याचा मास्क बनवल्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडचे शंकर कुराडे यांचा मास्क साडेपाच तोळ्यांचा असून, याची किंमत 2.89 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा देशातील सर्वात महागडा मास्क असण्याची देखील शक्यता आहे. कुराडे यांना सोने घालायला आवडते. त्यांच्या गळ्यात, हातात सोन्याची अंगठी, चेन पाहण्यास मिळते. सोन्याच्या दागिन्यांची हौस असल्याने त्यांनी स्वतःसाठी गोल्ड मास्क तयार करून घेतला आहे.

दरम्यान, हैदराबादच्या ज्वेलर्सनी सोन्याचे मास्क बनविण्याचा ट्रेंड देखील सुरू केला आहे. हा मास्क घालून तुम्ही सर्वत्र फिरू शकता. मात्र कोरोनापासून बचावासाठी हा मास्क उपयुक्त नाही.

Read More  हैदराबादी बिर्याणीने मिळवून दिला हक्काचा रोजगार

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या