21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रभाज्यांचे भाव कडाडले ;पावसाचा फटका

भाज्यांचे भाव कडाडले ;पावसाचा फटका

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. नगर, पुणे, नांदेड, परभणी, हिंगाली, नाशिक जिल्ह्यात अक्षरश: पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाज्या आणणारे ट्रक ट्रॅफिक, दरड कोसळणे यामुळे रस्त्यावरच अडकून राहिले आहेत. याचा परिणाम आता कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक घटली आहे.

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दरदिवशी २५० ते ३०० गाड्यांची आवक होते. मात्र पावसामुळे १५० गाड्यांची आवक होत आहे. आवक घटल्याने भाज्यांचे भाव कडाडले असून दुपटीने वाढले आहेत. कल्याणच्या मार्केटमध्ये नगर, पुणे, नाशिक येथून भाज्यांची आवक होते. तर गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून देखील भाज्यांची आवक होते.

मात्र गुजरातमध्ये देखील काही जिल्ह्यांत पूरपरिस्थिती आहे, याचा परिणाम कल्याणच्या कृषि उत्पन्न बाजार समितीला बसला असून पालेभाज्या व फळभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे काही दिवस तरी नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

रानभाज्यांना पसंती
दरम्यान ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या मिळतात आणि त्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे. पावसाळा सुरू झाला की, बाजारात रानभाज्या दिसायला लागतात. विशेष म्हणजे या भाज्या कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. कोणतेही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच असते.

या रानभाज्या मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळे, या ठिकाणी आढळतात. या भागातील आदिवासी मुंबईच्या इतर भागात येऊन या भाज्या विकतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच तसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या